Monday, 20 June 2016

शिक्षक संमेलन लातूर

*आनंदाने शिकण्याच्या दिशेने*
   
          शिक्षकांच्या समृद्धिसाठी, प्रगल्भीकरणासाठी खुपच छान शिक्षक संमेलन लातूर या ठिकाणी देखण्या रिसाॅर्ट मध्ये निसर्गरम्य ठिकाणी संपन्न झाले.

हा अविस्मरणीय अनुभव घेता आला. मलाही समृद्ध होता आले याचं मनोमन समाधान वाटलं.

   लातूरच्या प्रयोगशील गटशिक्षणाधिकारी
मा.तृप्ती अंधारे यांच्या कल्पकतेतुन  व करके देखो व्हाॅटस्अॅप ग्रुपच्या परिश्रमामुळे संमेलन खुपच छान झाले.

सर्वच तज्ञ मार्गदर्शकांनी उत्तम सादरीकरण केले व संवाद साधला. मीही मा. विठ्ठलराव भुसारे गटशिक्षणाधिकारी पूर्णा यांच्या सोबत एका
चर्चासत्राचे संचलन केले.

मा. अविनाश धर्माधिकारी सर ( माजी सनदी अधिकारी ) यांचे उद्घाटनपर मार्गदर्शन व मा.गोविंद नांदेडे शिक्षण संचालक विद्यापरीषद पुणे. यांचे समारोपाचे भाषण अविस्मरणीय ठरले.