Sunday, 5 June 2016

गुणगौरव

ग्रेट भेट
---------------------------------------------
आज प्रयोगशील अधिकारी आदरणीय सचिन जगताप साहेब शिक्षणाधिकारी ( प्रा. ) जि.प.उस्मानाबाद
यांची भेट घेतली. विविध शैक्षणिक विषयावर चर्चा केली.
साहेबांसोबत VC शीचा पण अनुभव घेता आला. अभ्यासु, व्यासंगी व दिलखुलास व्यक्तिमत्व असणाऱ्या साहेबांचे मनापासून धन्यवाद. मला  प्रेरणा देणारा  व समृद्ध करणारा सहवास लाभल्याने   मीही समृद्ध होत आहे.

माझी अभ्यासमंडळावर मराठी विषयासाठी सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल साहेबांनी गुणगौरव केला. पेढा भरवून अभिनंदन केले. खुप आनंद वाटला.

25 एप्रिल 2016 च्या शासननिर्णयानुसार पहिली ते बारावी पर्यंतचे अभ्यासक्रम, पाठ्यक्रम व पाठ्यपुस्तक पुनर्रचित करण्यासाठी अभ्यासमंडळाची स्थापना करण्यात आली आहे.