Thursday, 15 June 2017

● प्रवेशोत्सव शाळाभेट ●

● प्रवेशोत्सव शाळाभेट ●

आज सकाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढुमेवाडी ता.पुरंदर जि.पुणे या उपक्रमशील  शाळेला विषय सहायक  *श्री.समाधान शिकेतोड उस्मानाबाद, श्री. हेमराज रमधन  जालना,श्री.अजित राक्षे सातारा,श्री.नितीन मेमाने पुणे*  यांनी भेट दिली.

सकाळी सकाळी मुले उत्साहाने शाळेत आली होती. त्यांचे फुल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मुलांचे पालकही उपस्थित होते. शाळेत ABL पद्धत सुरू आहे.प्रत्येक मुलं शिकत आहे. मुख्याध्यापक  श्रीमती.विद्या देशमुख(मेमाने) व शिक्षीका श्रीमती.शैलजा गादे यांनी शाळेच्या गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. त्याचेही अभिनंदन करण्यात आले.

पहिल्या दिवशी चिमुकल्यांना भेटल्याचा आनंद काही औरच होता. या शाळेत  इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांनी प्रवेश घेतलेला आहे.