Sunday, 10 February 2019

वर्गभेट :एक समृद्ध अनुभव

आदरणीय डाॅ.कलिमोद्दीन शेख साहेब प्राचार्य DIECPD उस्मानाबाद यांच्या सोबत एकदा वर्गभेटीत अगदी कमी वेळेत वर्गातील प्रत्येक मुलांची वेगवेगळ्या विषयातील सद्यस्थिती काय आहे.हे कसं समजून घ्यावं. हे सरांच्या सोबत राहून समजून घेता आलं.मराठी,इंग्रजी,गणित या विषयाचं सरांनी उदाहरण दिलं आणि प्रत्येक मुलांची मूलभूत क्षमतेतील स्थिती लक्षात आली.ती अगदी दहा-पंधरा मिनीटात.....

सरांनी एक इंग्रजी वाक्य सांगुन मुलांना श्रुतलेखन करण्यास सांगितले. सर्व मुलांनी हे इंग्रजी वाक्य लिहल्यावर सरांनी ते वाक्य परत फळ्यावर लिहले.त्यातील प्रत्येक शब्द कुणाचा बरोबर आहे.हे विचारून ते त्याची वारंवारीता फळ्यावर लिहीली.एका वाक्यातील सर्व शब्द बरोबर लिहिणारे,एक शब्द,दोन शब्द,तीन शब्द.....असे किती विद्यार्थी आहेत.हे अगदी कमी वेळात शोधता आलं.
असंच मराठीचं इयत्तेतीच्या अनुरूप मराठी वाक्य श्रुतलेखनासाठी दिले.नंतर फळ्यावर लिहून इंग्रजी प्रमाणेच किती मुलांना अचूक श्रुतलेखन करता येते.किती मुलं कोणता शब्द चुकतात.हे समजून घेता आलं. ज्या मुलांना अचूक श्रुतलेखन करता येते.त्यांना वाचन करता येते.
मराठी वाक्य- छातीच्या पिंज-यात दोन फुफ्फुसांच्या दरम्यान ह्रदय असते.
इंग्रजी-Our school located near by bus stand.

गणितातील सद्यस्थिती एका भागाकाराच्या उदाहरणांनॆ समजून घेतली.607÷7 हे उदाहरण देवून मुलांना सोडवायला सांगितले. अचूक उत्तरे लिहणार-या मुलांची संख्या खूप कमी होती.
हे विद्यार्थी आठवीचे एका खाजगी अनुदानित शाळेतील आहेत.
शाळा भेटीत मुलांची सद्यस्थिती समजली तर पुढील कृतीकार्यक्रम बनवण्यास मदत होते.मुलांच्या शिकण्यातील अडचणी समजून घेऊन मुलांना विविध साहित्यांच्या आधारे अध्ययन अनुभव देता येतात.
शिक्षकांना मदत करता येते.

No comments:

Post a Comment