Friday 12 July 2019

कोण होणार करोडपती -अविस्मरणीय अनुभव


     उत्तर शोधलं कि जगणं बदलतं 

सोनी मराठी टी .व्ही. वरील कोण होणार करोडपती या खेळासाठी नावनोंदणी मोबाईलवरून केली होती.लाखो लोक अशी नावनोंदणी करतात.त्यामुळे आपला नंबर लागेल की नाही याची खात्री नव्हती.एके दिवशी अचानक फोन आला.तुमचं नागपूरला कोण होणार करोडपतीचं ऑडिशन आहे.खूप आनंद झाला.नागपूरला ऑडिशन दिलं.उस्मानाबाद ते नागपूर १६ तासाचा प्रदीर्घ प्रवास करून नागपुरात शेतकरी भवनला राहिलो होतो.सकाळी सात वाजता ऑडिशन स्थळी पोहचलो.नागराज सरांचा फोटो पाहून आनंद वाटला.फोटोच्या खाली लिहिले होते.
                    उत्तर शोधलं कि जगणं बदलतं 
हि थीम मला खुपचं आवडली होती.संपूर्ण महाराष्ट्रभरातून  ऑडिशन साठी सर्वजण  आले होते.दिवस भर ऑडिशन चाललं.लेखी परीक्षा,मुलाखत झाली.खुप मजा आली.मला विश्वास  वाटत होता कि माझी निवड होईल.पुन्हा १६ तासाचा प्रवास करून उस्मानाबादला आलो.

पुन्हा एके दिवशी "तुमची कोण होणार करोडपती" साठी निवड झाली आहे.असा फोन आला.खुुप आनंद झाला.फोन आला त्यावेळी मी पुण्यात SCERT मध्ये कार्यशाळेत होतो.

मुंबईला कसे,कधी यायचे.काय काय सोबत आणायचे,सोबत कोण येणार,कपडे कोणती व कशी असावी,कागदपत्रे कोणती आणावी.याबद्दल सविस्तर माहिती मिळाली.मग काय निघालो....कुटुंबासह ........

गोरे गाव फिल्म सिटीमध्ये हा  स्टूडियो आहे.सर्व व्यवस्था सोनी टी .व्ही ने केली होती.दोन दिवस शुटींग चालले.चार एपिसोडचे शुटींग झाले.फास्टर फिंगर राउंड मध्ये काही सेकांदामुळे हॉट सीट हुकलं.पण नवीन खूप शिकायला मिळालं.नागराज मंजुळे सरांना भेटता आलं.अनुभवता आलं.एका संवेदनशील मनाच्या चांगल्या माणसाला दोन दिवस अनुभवत होतो. नागराज सर म्हणजे ग्रेट माणूस......


1 comment:

  1. U r genius sir 👍💐
    Really great meet with Manjule Sir 😊👍

    ReplyDelete