Sunday 14 July 2019

मुलांसोबत पुस्तक तयार करणे

मुलांसोबत पुस्तक तयार करणे

SCERT,UNICEF व QUEST यांच्या संयुक्त विद्यमाने भाषा शिक्षणाचा दीर्घ मुदतीचा कोर्स पूर्ण करण्याची संधी मिळाली.दर महिन्याला दोन दिवस आदरणीय निलेश निमकर सरांचे मार्गदर्शन ऐकायला मिळायचे.त्यानंतर दहा दिवस शाळेत प्रत्यक्ष मुलांसोबत काम.
📌मुलांसोबत पुस्तके करताना प्रथम मुलांना चार शब्द देऊन गोष्ट लेखन करण्यासाठी सांगीतले.
📌 मुलांनी लिहलेल्या पहिल्या लिखाणाचे वाचन करून,गोष्ट कशी लिहावी. याबद्दल मार्गदर्शन केले. गोष्टची सुरूवात,मध्य  शेवट,गोष्टीतील पात्रे,संवाद याबद्दल चर्चा केली.
📌 मुले गोष्ट लिहताना त्यांच्या भावविश्वातील संदर्भ जोडून लिहत होती.विचार करत होती.तर्क करत होती.अंदाज बांधत होती.मुलांसोबत दररोज एक तास काम करत होतो.मुलांनी पुन्हा पुन्हा सुधारणा करून तिनदा गोष्ट लिहली.
📌 मग त्याचं गोष्टीचं पुस्तक तयार करण्याचं काम सुरू झालं. रंगीत झेराॅक्स पेपरला घड्या घालून पुस्तक तयार केलं. गोष्टीच्या थीमवरून मुले  पुस्तकांना नाव देत होती.
स्वतः चित्र काढून मुखपृष्ठ तयार करत होती. पुस्तकातील आशयानुसार मुलांनी पुस्तकात जागोजागी चित्रे रेखाटली,रंगवली.मुलांनी छान छान पुस्तके तयार केली.
📌 मुलांच्या स्व-अभिव्यक्ती क्षमतेचा विकास झाला.त्यांना पुस्तक निर्मितीची प्रक्रिया समजली.नवनिर्मितीचा आनंद लुटला.
याबद्दलचा व्हिडिओ नक्की पहा.

https://youtu.be/yRdyWlIWzuc

  समाधान शिकेतोड
DIECPD,उस्मानाबाद.

No comments:

Post a Comment