Friday, 6 September 2019

जीवन शिक्षण जुलै 2019 चा नक्की वाचा

प्रारंभिक भाषा विकास अभियान -जुलै 2019 चा जीवन शिक्षण अंक
-----------------------------------------------------------------------
आपल्या वर्गातील मुलांना वाचते,लिहते,शिकते करण्यासाठी  केंद्रिय मनुष्यबळ विकास मंत्रालय MHRD च्या प्रारंभिक भाषा विकासाबाबतच्या मार्गदर्शक सूचना,युनिसेफने विकसीत केलेला प्रशिक्षण घटकसंच,आपल्या राज्यात भाषा विकासासाठी परिणामकारक काम करणा-या संस्थांचे कार्यक्रम या सर्वांचा अभ्यास करून युनिसेफच्या मदतीने  राज्यस्तरावर *" प्रारंभिक भाषा विकास अभियान:इयत्ता पहिली* हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.
 इयत्ता पहिलीच्या वर्गातील मुलांच्या भाषिक क्षमतांचा विकास करण्यासाठी शास्त्रीय बैठक तयार होण्यास व दैनंदिन अध्ययन अनुभव परिणामकारकपणे देता यावेत. यासाठीचे मार्गदर्शन या अंकातील प्रत्येक लेखात मिळते.
 मुलांचा भाषा विकास एकात्मिक पद्धतीने होत असतो.त्यासाठी वर्गांतर क्रियेत कोणत्या व कशा पद्धतीने कृती घ्याव्यात.यासाठी क्षेत्रनिहाय कृतींचे नियोजन दिलेले आहे.
 मौखीक भाषा विकास,ध्वनिंची जाण,मजकूर समृद्ध वातावरण,वाचन व लेखन या क्षेत्रांचा नियोजनपूर्वक वापर दैनंदिन अध्ययन अनुभव देताना कसा करावा हे समजून घेण्यासाठी "रोजचे विणकाम" हा लेख उपयुक्त आहे.
 मुलांना वाचते,लिहते करण्यासाठी शाळेतील व वर्गातील वातावरण मजकूर समृद्ध असायला हवे.इयत्ता पहिलीच्या वर्गातील मजकूर समृद्ध वातावरण कसे तयार करता येईल याबद्दलचे मार्गदर्शन "मजकूर समृद्ध वातावरणातून लिपीची जाण" या लेखांमधून केलेले आहे.वर्गामध्ये वाचन कोपरा,लेखन कोपरा असायला हवा.याबद्दल माहिती सांगितलेली आहे.
 लेखी मजकुराची जाणीव व्हावी यासाठी सहभागी वाचन कसे घ्यावे. याबद्दलची माहिती सहभागी वाचन या लेखातून मिळते. मुलाचे बोलणे हे शिकण्याचे एक साधन आहे. ते शिकणे घडण्यासाठी कसे उपयोगात आणता येईल. यामागचा विचार स्पष्ट करणारा "मुलांचे बोलणे आणि भाषा विकास" हा लेख वाचल्यानंतर मौखिक भाषा विकासाचे महत्व समजते.
 मुळाक्षरे, बाराखडी याऐवजी अक्षर गट पद्धतीने मुलांना वाचन शिकवल्यानंतर मूल लवकर अर्थपूर्ण वाचायला शिकते. याबद्दलचा "वाचते करण्यासाठी: अक्षर गट" हा लेख वाचन शिकण्याच्या टप्प्याविषयी नवीन दृष्टी देतो.
 वाचन व लेखन शिकविण्या  अगोदर पूर्वतयारीच्या कृती विषयी सविस्तर माहिती या अंकात आहे. अध्ययन समृद्धी साहित्यसंच  पेटीतील साहित्य व इतर साहित्यांचे व्यवस्थापन कशा पद्धतीने करावे. याबद्दल  मार्गदर्शन करणारा लेख  या अंकात आहे.
 मुलांसाठी पूरक वाचन साहित्य कसे असावे, त्याची निवड कशी करावी. याबद्दल सविस्तर मार्गदर्शन "वाचन साहित्य निवडताना" या लेखात केले आहे.
 मुलांच्या भाषिक प्रगतीचे मूल्यमापन करण्यासाठी क्षेत्रनिहाय निर्देशक दिलेले आहेत. यामुळे प्रत्येक मूल कोणत्या टप्प्यावर आहे हे समजून घ्यायला नक्कीच मदत होते.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या परिषद) पुणे यांच्या मार्फत प्रकाशित झालेला हा अंक वाचनीय तर आहेच पण प्रत्येकाने संग्रही ठेवायलाच हवा.
          समाधान शिकेतोड
            विषय सहायक
        DIECPD,उस्मानाबाद

No comments:

Post a Comment