Sunday, 8 September 2019

श्री.नितीन तावडे यांची अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड

आज अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्वागत मंडळ समिती सदस्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत जानेवारी 2020 मध्ये  उस्मानाबाद येथे
होणा-या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी श्री. नितीन तावडे,अध्यक्ष मराठवाडा साहित्य परिषद उस्मानाबाद. याची निवड झाली.प्रसिद्ध कवी व पत्रकार श्री.रवी केसकर यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे सचिव श्री.माधव इंगळे यांची कोषाध्यक्षपदी निवड झाली आहे.
उस्मानाबाद नगरी मध्ये पहिल्यांदा अखिल भारतीय साहित्य होणार आहे. याची जय्यत तयारी उस्मानाबादकर करत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व साहित्यप्रेमी,सामाजिक कार्यकर्ते,स्वयंसेवी संस्था, शिक्षण संस्था संमेलनाच्या तयारीसाठी झोकून देऊन कामाला लागले आहेत. हा साहित्योसव साजरा करण्यासाठी सर्वजण तयारी करत आहेत.मी ही या साहित्य संमेलनाची खूप उत्सुकतेने वाट पाहत आहे.


No comments:

Post a Comment