व्यंकटेश चौधरी यांच्या "एक शून्य प्रतिक्रिया" या कवितासंग्रहाचे प्रकाशन
--------------------------------------------------------
--------------------------------------------------------
श्री.व्यंकटेश चौधरी यांचा "एक शून्य प्रतिक्रिया" हा कवितासंग्रह पीपल्स कॉलेज,नरहर कुरुंदकर प्रगत अभ्यासकेंद्र सभागृह,नांदेड. या ठिकाणी १४ सप्टेंबर २०१९ रोजी प्रकाशित होत आहे त्यानिमित्ताने............
प्रसिद्ध साहित्यिक तथा विस्तार अधिकारी (शिक्षण) जि.प.नांदेड श्री.व्यंकटेश चौधरी यांचा *एक शून्य प्रतिक्रिया* हा कवितासंग्रह गेल्या आठवड्यात मी ऑनलाईन मागवून वाचला. "शब्दालय प्रकाशन" श्रीरामपूर यांनी तो प्रकाशित केलेला आहे. व्यंकटेश चौधरी हे संवेदनशील व प्रयोगशील अधिकारी तर आहेतच त्याचबरोबर प्रसिद्ध साहित्यिक,समीक्षक,निवेदक, उत्कृष्ठ सूत्रसंचालक,आहेत.काही वर्षे त्यांच्या सहवासात मला राहण्याची,त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. एक चांगला माणूस,मित्र, मार्गदर्शक,तत्वज्ञ,वाटाड्या सर्वकाही.............
त्यांच्या या कवितासंग्रहाची मला उत्सुकता होती.कवितासंग्रह हातात पडल्या पडल्या त्यातील सर्व कवितांचा आस्वाद घेतला. त्यांनी संवेदनशीलपणे समाजातील वास्तव आपल्या कवितांमधून मांडलेलं आहे. या कवितासंग्रहाची मन्याडीच्या काठावरून,किर्द,एक झाड एक दोर,कविता बाईलेकीच्या,तिनका तिनका जगणं,या पाच भागात मांडणी केली आहे."एक झाड एक दोर"मधील कविता शेतकऱ्यांच्या जगण्यातील वेदनांचा वाट मोकळी करून देतात."बाप पोळतो आहे" ही पहिलीच कविता ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकरी बापाला पावसाची किती काळजी वाटते. बापाच्या काळजीने कवींचा जीव तीळतीळ तुटत आहे.ही कविता जीवाला चटका लावून जाते.
किती पेरला जीव
तरी कोरडीच ओल
ओतले आयुष्य परी
देह जाईनाच खोल
तरी कोरडीच ओल
ओतले आयुष्य परी
देह जाईनाच खोल
अशा कवितेच्या ओळी हृदयाचा ठाव घेतात.त्यांच्या सर्वच कविता आशयगर्भ व आशयगहन आहेत. त्यांचं जगणं खुप अनुभव संपन्न, समृद्ध आहे.याचा प्रत्यय त्यांच्या प्रत्येक कवितांमधून येतो.काही कविता खूप छोट्या आहेत.परंतु खूप काही सांगून जातात.कविता वाचताना मनाला हुरहूर लागते. त्यांचा प्रगल्भ असा वैचारिक व भावनिक प्रवास प्रत्ययास येतो. त्यांच्या कविता आशय,विषय, मूल्य,प्रतिभा व प्रतीकांच्या पातळीवर उत्कृष्ट आहेत.
श्री.व्यंकटेश चौधरी यांचे मुळगाव नंदगाव आहे.हे गाव मुखेड तालुक्यात आहे.लहानपणीचं भोवताल,निसर्ग,मन्याड नदीच्या समृद्ध आठवणी त्यांनी आपल्या कवितांमधून जाग्या केल्या आहेत. त्यांच्या कवितांमधून आई-वडिलांबद्दलची कृतज्ञता व्यक्त होते.
त्यांच्या या प्रेरणादायी कविता जगण्याला बळ, हिंमत देतात. "भीमराया" या कवितेतील या ओळी जगण्याला प्रेरणा देतात.
त्यांच्या या प्रेरणादायी कविता जगण्याला बळ, हिंमत देतात. "भीमराया" या कवितेतील या ओळी जगण्याला प्रेरणा देतात.
लावलास जाळ अंधाराला
अन् उजेडाला फुटले पाय
अनवाणी लेकराला
लाभली दिशेची माय
अन् उजेडाला फुटले पाय
अनवाणी लेकराला
लाभली दिशेची माय
आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची अस्वस्थता त्यांनी संवेदनशीलपणे एक शून्य प्रतिक्रिया म्हणून मांडली आहे.
आपणही कवितासंग्रह नक्की वाचावा.
आपणही कवितासंग्रह नक्की वाचावा.
|| एक शून्य प्रतिक्रिया||
(कवितासंग्रह)
शब्दालय प्रकाशन,श्रीरामपूर.
मूल्य- २०० रुपये.
(कवितासंग्रह)
शब्दालय प्रकाशन,श्रीरामपूर.
मूल्य- २०० रुपये.
समाधान शिकेतोड
उस्मानाबाद.
उस्मानाबाद.
No comments:
Post a Comment