जिल्हा गुणवत्ता कक्षाची बैठक संपन्न
----------------------------------------------------
दिनांक:- 30 सप्टेंबर 2019
स्थळ - DIECPD,उस्मानाबाद.
----------------------------------------------------
दिनांक:- 30 सप्टेंबर 2019
स्थळ - DIECPD,उस्मानाबाद.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र व निती आयोग अंतर्गत मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.या अनुषंगाने आज DIECPDउस्मानाबाद येथे मा.डॉ. संजय कोलते,मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा गुणवत्ता कक्षाची बैठक संपन्न झाली.याप्रसंगी मा.डॉ.आय.पी नदाफ,प्राचार्य,मा.सविता भोसले शिक्षणाधिकारी (प्रा.) मा.गजानन सुसर शिक्षणाधिकारी (मा.) मा.रोहिणी कुंभार,उपशिक्षणाधिकारी,सर्व तालुक्याचे मा.गटशिक्षणाधिकारी, मा.अधिव्याख्याता,विषय सहायक उपस्थित होते.
सर्व तालुक्याच्या सन्माननीय गटशिक्षणाधिकारी यांनी PGI नुसार शाळाभेटी, NAS सराव चाचणी निकाल,नीती आयोगातील दर्शक,शिष्यवृत्तीची तयारी,तालुक्यातील विविध नाविन्यपूर्ण उपक्रम यांचे सादरीकरण केले.
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निती आयोगातील दर्शकांची पूर्तता करणे,शाळांमध्ये ॲस्ट्रॉनॉमी लॅब ची निर्मिती करणे,शाळेत ग्रंथालय व प्रयोगशाळा यांचा वापर अध्ययन अनुभव देण्यासाठी करणे याबद्दल प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
मा.प्राचार्य यांनी सर्व मुलांच्या मूलभूत क्षमता प्राप्त करणे व सर्व मुलांच्या अध्ययन निष्पत्ती प्राप्त करणे यासाठी करावयाच्या कृती कार्यक्रमाबद्दल मार्गदर्शन केले.मूलभूत क्षमतेत पाठीमागे असणाऱ्या शाळा केंद्र दत्तक घ्याव्यात.असे आवाहन केले.
नववी,दहावीच्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन,भाषा,गणित व इंग्रजी साहित्य पेटी चा वापर अध्ययन अनुभवात करणे,शाळेतील वातावरण अध्ययन समृद्ध करणे, शिष्यवृत्ती, ग्रंथालय, प्रयोगशाळा याबाबत सविस्तर चर्चा झाली.

बैठकीचे प्रास्ताविक मा. डॉ.प्रभाकर बुधाराम, अधिव्याख्याता यांनी केले व मा.गजानन सुसर शिक्षणाधिकारी (मा.) यांनी सर्वांचे आभार मानले.
समाधान शिकेतोड
DIECPD,उस्मानाबाद.
DIECPD,उस्मानाबाद.
No comments:
Post a Comment