लोकसंख्या शिक्षण विषयक विभागीय स्पर्धा संपन्न
----------------------------------------------------------------
स्थळ- DIECPD, उस्मानाबाद.
दिनांक- 27/9/2019
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने DIECPD, उस्मानाबाद येथे विभागस्तरीय लोकसंख्या शिक्षण विषयक भूमिका अभिनय व लोकनृत्य या स्पर्धा संपन्न झाल्या.या स्पर्धेमध्ये लातूर,नांदेड,उस्मानाबाद जिल्ह्यातील संघ सहभागी झाले होते.या स्पर्धेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.डॉ.आय.पी. नदाफ, प्राचार्य, DIECPD उस्मानाबाद यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून वरिष्ठ अधिव्याख्याता मा.राजेंद्र गिरी,अधिव्याख्याता मा.डॉ.प्रभाकर बुधाराम, मा.सय्यद अख्तर,मा.नारायण मुदगलवाड,मा.बिरप्पा शिंदे,मा.अर्चना नलावडे,मा.सुचित्रा जाधव हे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक लोकसंख्या शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख मा.सय्यद अख्तर यांनी केले.
भूमिका अभिनय स्पर्धेमध्ये शासकीय निवासी शाळा (मुलींची) बावची तालुका रेणापूर जिल्हा नांदेड या शाळेचा प्रथम क्रमांक आला.तर जिल्हा परिषद प्रशाला (मुलींची) मुखेड तालुका मुखेड जिल्हा नांदेड या शाळेचा लोकनृत्य या प्रकारामध्ये प्रथम क्रमांक आला.स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन मा.डॉ. प्रताप काळे,उपजिल्हाधिकारी उस्मानाबाद,मा.डॉ.आय.पी. नदाफ,प्राचार्य, DIECPD,उस्मानाबाद,मा.राजेंद्र गिरी,वरिष्ठ अधिव्याख्याता,मा.सय्यद अख्तर,विभाग प्रमुख,लोकसंख्या शिक्षण या मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याकडून दरवर्षी वेगळ्या वाटेने जाणा-या,आगळा-वेगळा विचार
करणा-या,धडपणा-या व उत्कृष्टतेचा ध्यास असणा-या शिक्षकांसाठी नवोपक्रम स्पर्धा आयोजित केली जाते.
सन-2018-2019 मधील नवोपक्रम स्पर्धेत जिल्हास्तरावर यशस्वी झालेल्या उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान मा.डॉ.प्रताप काळे,उपजिल्हाधिकारी, उस्मानाबाद,डॉ.आय.पी.नदाफ,प्राचार्य, DIECPD,उस्मानाबाद,मा.राजेंद्र गिरी,वरिष्ठ अधिव्याख्याता,मा.डाॅ.प्रभाकर बुधाराम,विभाग प्रमुख संशोधन यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. *याप्रसंगी मा.डाॅ.प्रताप काळे,उपजिल्हाधिकारी यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.तसेच उपक्रमशील शिक्षकांच्या रचनात्मक कार्याचे कौतुक केले.*
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.अर्चना नलावडे, अधिव्याख्याता व श्री.समाधान शिकेतोड,विषय सहायक यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व अधिकारी,विषय सहायक,कार्यालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
शब्दांकन
समाधान शिकेतोड
DIECPD,उस्मानाबाद.
No comments:
Post a Comment