देशातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रख्यात विज्ञान लेखक डॉ.जयंत नारळीकर यांची ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
विज्ञानासारखा एरवी अनेकांना क्लिष्ट वाटणारा विषय आपल्या रोचक लेखनशैलीत मांडून लहान-थोरांत विज्ञानाची आवड निर्माण केली. गेल्या सहा दशकांहून अधिक काळ मूलभूत संशोधनासोबतच विज्ञान प्रसाराचे व्रत जपणारे ज्येष्ठ खगोलभौतिकशास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर यांचे साहित्यक्षेत्रात बहुमोल योगदान आहे.
त्यांनी अनेक विज्ञानविषयक पुस्तकांचे लेखन केलेले आहे. त्यांना भारत सरकारने पद्मभूषण तसेच पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. राज्य सरकारने त्यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव केला आहे. अशा महान व्यक्तिमत्वाची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणे ही आनंदाची व अभिमानाची बाब आहे.
No comments:
Post a Comment