Thursday, 18 March 2021

वाचनसंस्कृती रूजवण्यासाठी प्रेरणादायी उपक्रम

सरमकुंडी शाळेतील विद्यार्थी झाले किशोरचे वर्गणीदार

वाचनसंस्कृती रूजवण्यासाठी प्रेरणादायी उपक्रम 

 बालभारतीकडून दरमहा 'किशोर मासीक' विद्यार्थ्यांसाठी प्रकाशीत केले जाते. विद्यार्थी किशोर मासीकाचे आवडीने वाचन करत असतात.मुलांना समृद्ध असं वाचनसाहित्य वाचायला मिळावं.यासाठी सरमकुंडी गावातील जिल्हा परिषदेच्या इयत्ता पाचवी ते सातवीमधील सर्व विद्यार्थ्यांची  वर्गणी "माझी सरमकुंडी" या गटातील मित्रमंडळींनी भरली.ही  संकल्पना राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक समाधान शिकेतोड यांनी मांडली. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सरमकुंडी ता.वाशी या शाळेतील  इयत्ता पाचवी ते सातवीमधील सर्व 110 विद्यार्थ्यांची 5500/- रू. वर्गणी भरण्यात आली. 

 मुलांना अवांतर वाचनाची गोडी लागावी.मुलांच्या भाषिक क्षमतांचा,व्यक्तीमत्वाचा विकास व्हावा.यासाठी "किशोर" मासिक मुलांना दर महिन्याला वाचण्यासाठी मिळायला हवे. या मासिकात कथा, कविता, सामान्यज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण, प्रेरणादायी लेख, कोडी, इंग्रजीतून गोष्टी इत्यादी साहित्य मुलांना वाचनासाठी असते. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलांना   मुलांना किशोर मासीकाचा स्वयंअध्ययन करण्यासाठी उत्तम वाचनसाहित्य म्हणून उपयोग होईल. मुलांच्या अभिव्यक्तीच्या विकासासाठी किशोर मासीक उपयुक्त आहे.या मासिकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.

 सध्या किशोर मासीकाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 'किशोर मासीकाचीवार्षिक वर्गणी अवघी पन्नास रूपये ठेवण्यात आली आहे. तरी विद्यार्थ्यांना अवांतर वाचनासाठी पुरक वाचनसाहित्य म्हणून किशोर मासीक वाचनासाठी द्यावे.असे आवाहन बालसाहित्यिक समाधान शिकेतोड यांनी केलेले आहे.

 "मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढी किशोर मासीक उपयुक्त आहे.सरमकुंडी शाळेचा उपक्रम प्रेरणादायी आहे.इतरही शाळांनी हा उपक्रम राबवावा."

   - राहुल भट्टीगटशिक्षणाधिकारी वाशी 

 " किशोर मासीक मुलांना अवांतर वाचनासाठी पुरक वाचनसाहित्य म्हणून उपयुक्त आहे. शालेय वयात मुलांमध्ये वाचनसंस्कृती रूजवण्यासाठी किशोर या मासिकाचा उपयोग होईल.या मासिकातून मुलांना उत्तम व दर्जेदार बालसाहित्य वाचायला मिळते.त्यासाठी मुलांना हे मासीक वाचायला द्यायला हवे ".

 - समाधान शिकेतोड, बालसाहित्य


 


No comments:

Post a Comment