मुलांना
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण कसे देता येईल यावर
जगभर काम सुरू आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तर ती काळाची गरज बनली आहे.या
पार्श्वभूमीवर वोपा टिमचे रचनात्मक कार्य कौतुकास्पद आहे.वोपाचे संचालक
श्री.प्रफुल्ल सर यांनी पहिल्या प्रशिक्षणात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कसे आपण
मुलांना दर्जेदार शिक्षण देऊ शकतो हा प्रगत अध्यापनशास्त्रीय दृष्टीकोन अनेक
व्यावहारिक उदाहरणे देऊन सांगीतला होता.तो पटलाही होता.त्यानंतरच्या कार्यशाळेत
त्यांनी वोपा या पोर्टलवर पाठ कसे तयार करावेत.कोणकोणत्या तांत्रिक बाजू
महत्त्वपूर्ण आहेत. सोप्या पद्धतीने कसे काम करावे याबाबत माहिती दिली
होती.त्यानंतर प्रत्यक्ष आम्हाला पाठ्यपुस्तकातील पाठावर काम करायचे होते.
मी इयत्ता सातवीच्या मराठी विषयातील पु.ल.देशपांडे यांचा 'बाली बेट' हा पाठ निवडला. हा पाठ विविध अध्ययनस्त्रोतांच्या
माध्यमातून जिवंत कसा करावा. याबद्दल मनातच कृतीआराखडा तयार झाला होता. पोर्टलवर
लॉगीन करून आत्मविश्वासाने पाठ तयार करायला सुरूवात केली. मुलांना
आकलन, उपयोजन, विश्लेषण करता येईल अशा
कृतींची मांडणी केली. यासाठी व्हिडीओ, ऑडीओ, जिआयएफ, पिडीएफ, विकिपीडिया अशा विविध
बाबींचा वापर केला.काही कृती मुलांना सर्जनशील पातळीवर नेणाऱ्या होत्या.मोबाईलच्या
बाहेर जाऊन मुलांना कृती करण्यासाठी दिलेल्या होत्या. उदा. १.या पाठातील इंग्रजी
शब्द शोधून वहीत लिहा.२.पु.ल.देशपांडे यांची पुस्तके मिळवून वाचा. अशा कृती,उपक्रम दिले. पाठात बाली बेटाबद्दलचा एक छान व्हिडीओ टाकला आहे.हा
व्हिडीओ पाहून मुलांना नक्कीच बाली बेटाची सफर घडून येईल.
काम करताना एक अडचण आली होती. त्याबद्दल प्रफुल्ल सरांनी मार्गदर्शन
केले. वोपाच्या पोर्टलवर हा पाठ बनविण्याचा अनुभव मस्त होता.खुप नवीन शिकायला
मिळाले.इयत्ता सातवीच्या पाठ्यपुस्तक निर्मिती करण्याच्या प्रक्रियेत मी सहभागी
होतो. आता या पाठ्यपुस्तकातील पाठ जीवंत करताना सर्जनशीलतेचा कस नक्कीच लागतोय; पण आनंदही मिळतोय. लॅपटॉपवर वेळही खुप द्यावा लागतो.पण मुलांसाठी नवनिर्मितीचा
आनंद सारा थकवा दूर करतो.माझा मुलगा सातवी इयत्तेत शिकतो.त्यालाही पाठ खूपच आवडला.
माझ्या इतर सहकारी मित्रांनीही खूप छान पाठ बनविलेले आहेत.त्यांचेही
अभिनंदन. प्रफुल्ल सर व ऋतुजा मॅडम व सर्व वोपा टिमचे आभार.
No comments:
Post a Comment