Wednesday, 28 July 2021

चाचणीची झेरॉक्स

नेहमीप्रमाणेच मी बार्शी नाक्यावरील एका झेरॉक्यच्या दुकानातून झेरॉक्य घेत असतो.एका पुस्तकाच्या झेरॉक्य घेण्यासाठी दुकानात गेलो होतो. दुकानात झेरॉक्य काढण्यासाठी वर्दळ सुरूच होती.माझ्या झेरॉक्य जास्त असल्यामुळे मी उभा होतो.तेवढ्यात एक छोटा मुलचा आवाज कानावर आला.

"अहो काका....अहो काका...चाचणीच्या झेरॉक्य द्या की.." दुकानदार अरे पहिले उदारीचे पैसे दे की म्हणत होता.त्याच्या सोबत अजुन एक मुलगा होता.तो एवढ्या नम्रपणे व आदराने हसुन झेरॉक्य मागत होता.त्याचा आवाज थेट माझ्या काळजात शिरत होता.

मला माझ्या बालपणीचे दिवस आठवले. शाळेत असताना मला वही,पेन घेण्यासाठी पैसे नसायचे. आमच्या घराशेजारी अस्लम भाईचे किराणा दुकान होते.त्या दुकानातून मी वह्या,पेन उदार घेत असायचो.आईचे मजूरीचे पैसे आले की उदारी चुकती व्हायची.कधी कधी दुकानात ओळखीचं कोणी गिर्‍हाईक असंल की उदार मागायला लाज वाटायची.उदार गिर्‍हाईक म्हटलं की दुकानदाराचा जरा कानाडोळाचं असतो. त्यामुळे पाच रूपयाच्या वहीसाठी अर्धा अर्धा तास दुकानाबाहेर उभा राहायचो.अस्लम भाईला विनंती करायचो. अस्लम भाईपण भला माणूस. का कू करत तोही साहित्य द्यायचा. शिकायची उर्मी अंगात होती.त्या मुलाला पाहून मला माझं बालपण आठवलं. 

माझ्या झेरॉक्य सोबत त्याच्याही चाचणीचे पैसे दिले.तो तिसरीला होता. त्याला सेतू अभ्यासाची चाचणी हवी होती. माझ्यासारखीचं त्याच्यात शिकण्याची उर्मी दिसत होती.मी तिथून निघताना तो माझ्याकडे पाहत होता.मी मोटारसायकलवर बसलो..निघालो... तो माझ्याकडे कृतज्ञतेच्या नजरेनेने बघत राहीला.....

 

No comments:

Post a Comment