आज सरमकुंडीला गावी गेलो होतो.पावसाच्या पाण्यानं पिकं पाण्याखाली गेली होती. गुडघाभर पाण्यात,चिखलात शिरून सोयाबीन काढण्याची धडपड सुरू होती.
उस्मानाबाद जिल्ह्यात पुरपरिस्थिमुळे गावची गावं पाण्यात गेली. वर्तमानपत्रांतील बातम्या वाचताना खूप वेदना होत होत्या.या आसमानी संकटानं पुन्हा बळीराजावर संकट आलं
सहजंच मनातल्या भावना गझलेच्या रूपानं माडल्या.
कोपलेल्या आभाळाचा, प्रकोप झाला असा
पुराच्या प्रवाहात, शिवार वाहून गेले
सुना करून गोठा, दावणीचे बैल गेले
शेळ्या वाचविल्या, पण बैल राहून गेले
चिबडलेल्या रानाचं, फोटोसेशन झालं पुरे
आश्वासन देऊन ते सारे,पाहून गेले
पाण्यावर तंरंगल्या, सोयाबीनच्या गंजी
डोळ्यातील अश्रू, आता आटून गेले
पुराच्या पाण्यानं, सारं खरवडून नेले
पाण्याखाली शिवार सारं,काळीज फाटून गेले
पुन्हा उभा राहीन,नव्या दमाने आता
नको सहानुभूती ती,मला वाटून गेले
©️ समाधान शिकेतोड
No comments:
Post a Comment