गेले दोन दिवस हैदराबाद मेट्रोच्या प्रवासाचा अनुभव घेतोय.मेट्रोविषयी वाचलं होतं.कधी मेट्रोतून प्रवासात करायला मिळेल याची उत्सुकता होती.हैदराबादमधील मेट्रो खूपच छान आहे.मेट्रो स्टेशनमध्ये गेल्यावर विमानतळावर गेल्यासारखं वाटतं. सगळी संगणकीय प्रणालीवर चालणारी यंत्रणा. सगळीकडे, टापटीपणा, स्वच्छता दिसत होती.कसलाच गोंधळ,गडबड नाही.मेट्रोतून प्रवास करताना अथांग पसलेलं हैदराबाद नजरेत मावत नाही.
अथर्व साडूचा मुलगा. अतिशय शांत,मेहनती.दहावीला माझ्याकडेच होता. तो सध्या IIT ची तयारी करतोय.त्याची कोंचिग पाहण्यासाठी व त्याला इथं हैदराबादला सोडण्यासाठी आलोय.त्याचा एक मित्र इथं क्लॅटची तयारी करतोय.LLB च्या नामांकित काॅलेजाला प्रवेश घेण्यासाठी ही प्रवेश परिक्षा असते.त्याच्याकडून या नवीन विषयाची माहिती मिळाली.त्याचं संवाद कौशल्य तर फारच सुंदर आहे. त्याला हैदराबादची चांगली माहिती आहे. त्याच्या मित्रामुळं हैदराबाद फिरणं सोपं झालं.
हैदराबाद फिरताना आजूबाजूला सगळे तेलगू बोलणारेच.एखादा मराठी माणूस भेटला तर खूप आनंद होतो.काल रात्री मेट्रो स्टेशनवर एकजण भेटला. त्यांने सांगीतलं,"मी उमरग्याचा आहे".
मग तर आपल्याच जिल्ह्यातील म्हटल्यावर खूप आनंद वाटला. बालाजी इंगळे सर माझे मित्र आहेत म्हटल्यावर तो म्हणाला, "ते माझे सर आहेत."
साहित्यीक बालजी इंगळे सरांचा विद्यार्थी म्हटल्यावर तर अजून खूपच भारी वाटलं.तो तिथं मेट्रोतच पार्ट टाईम जाॅब करून MBA करतोय. त्याच्यासोबत खास सेल्फी काढली.
No comments:
Post a Comment