Sunday, 30 October 2022

हैदराबाद डायरी

दोन तीन दिवस हैदराबाद फिरताना छान वाटलं. मेट्रोतून प्रवास करताना तेलगू निवेदन तर पाठ झालं. तिथं फिरताना दुकानाच्या बहुतांशी पाट्या इंग्रजी व तेलगू या दोन भाषेत दिसत होत्या. फिरताना कुणाला काही माहिती विचारली तर अगदी नम्रपणे माहिती सांगत होते. संवाद साधताना भाषेची अडचण आली नाही. इंग्रजी, हिंदीतून सहज संवाद साधता आला. स्थानिक लोक मात्र एकमेकांशी तेलगूमध्येच संवाद साधतात. चित्रपटगृहात जास्त प्रमाणात चित्रपटाही तेलगू असतात 

हैदराबादमधील मराठी साहित्य परिषदेला भेट देण्याची खूप इच्छा होती.हैदराबाद मधील मराठी साहित्य परिषद पंचधारा हे त्रैमासिक प्रकाशित करते. हे मराठी साहित्य परिषद हैदराबादचे मुखपत्र आहे. संशोधनपर आणि समीक्षात्मक लेखन हे पंचधाराचे महत्त्वाचे अंग आहे.पंचधारेने जवळ जवळ बरेच विशेषांक प्रकाशित केले आहेत. त्यापैकी तेलुगू विशेषांक, दक्षिणी भारतातील स्त्री लेखिका विशेषांक, उर्दू साहित्य विशेषांक, दक्षिणी भाषा शब्दकोश, भाषाशास्त्र विशेषांक, कुमार गंधर्व विशेषांक, नरहर कुरुंदकर विशेषांक, गालिब विशेषांक आणि इतर विशेषांक खूपच छान आहेत. पंचधारेची वर्गणी भरायची होती. 

गुगलच्या मदतीनं कार्यालय शोधण्यात अर्धा दिवस गेला.शेवटी जस्ट डायलनं पत्ता पाठवला.प्रसिद्ध साहित्यिक बालाजी इंगळे सरांनीही पत्ता पाठवला. रविवारचा दिवस असल्यामुळे कार्यालयाला सुट्टी होती. खूप हिरमोड झाला. शेवटचा दिवस असल्यामुळे परत निघालो. परत गेल्यावर नक्की भेट देईल. 

No comments:

Post a Comment