Friday, 11 November 2022

मुलं लिहती होत आहेत

मुलं लिहती होत आहेत

मुलांच्या अभिव्यक्तीला धुमारे फुटत आहेत. राज्यातील अनेक शालेय विद्यार्थ्यी लिहती होत आहेत. कविता,दैनंदिनी,कथा इत्यादी लेखन करत आहेत. इयत्ता सहावीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात इयत्ता सहावीच्या विद्यार्थीनीची कविता आलेली आहे. प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यांचे अंगभूत कलागुणांना पाठबळ द्यायला हवं.प्राचीच्या वडीलांनी तिच्या सर्जनशीलतेला ओळखून पाठबळ दिल्यामुळे हा सुंदर कवितासंग्रह प्रकाशित होत आहे.

इयत्ता आठवीमध्ये शिकणारी विद्यार्थींनी कु.प्राची काळे हीचा 'वाटते मज शब्दफुल व्हावे' हा कवितासंग्रह रविवारी,१३ नोव्हेंबर रोजी समग्र प्रकाशनामार्फत प्रकाशित होत आहे.

 या पुस्तकाचे सुंदर मुखपृष्ठ आमचे मित्र श्री.संतोष घोंगडे यांनी केलेले आहे.आतील चित्रे चित्रकार श्री.राजेंद्र अत्रे यांनी काढलेली आहेत. या पुस्तकाला कवी प्रा.डाॅ.अरविंद हंगरगेकर यांनी प्रस्तावना दिली आहे.पुस्तक प्रकाशनासाठी मित्रवर्य बालसाहित्यक श्री.फारूक काझी,तहसीलदार श्री.सुरेश घोळवे येत असल्याचा आनंद द्विगुणित होत आहे.
या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमास खूप खूप शुभेच्छा.

No comments:

Post a Comment