Friday, 11 November 2022

ॠच्याचं चित्र

काल इयत्ता चौथीतील ॠचानं एक छान चित्र काढून दाखवलं.दिवाळी कशी साजरी केली?या संदर्भात चित्र होतं. या चित्रात तिनं घर,पणत्या,आकाशकंदील,ती अन् तिचा भाऊ असं काढलेलं होतं. पण तिच्या चित्राला पाय दिसत नव्हते.मग मी तिला विचारलं, "अगं चित्राला पाय दिसत नाहीत." त्यावर ती म्हणाली," अहो सर,पाय झाकून गेलेत."
मुलं कशी विचार करतात. किती चिकित्सक व सर्जनशील पातळीवर जाऊन मुलं विचार करतात.कलेच्या माध्यमातून मुलांना फुलण्याच्या फार उत्तम संधी मिळतात.

No comments:

Post a Comment