Sunday, 18 October 2015

वाचन प्रेरणा दिन


    📚 वाचन प्रेरणा दिन 📖
आज जि.प.प्रा.शाळा हाडोंग्री व भगवंत विद्यालय हाडोंग्री यांनी संयुक्तपणे डॉ.ए.पी जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी केली. विद्यार्थ्यांना डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्याविषयी माहिती सांगितली.

  जि.प.प्रा.शाळा हाडोंग्री ता.भूम जि.उस्मानाबाद येथे वाचन प्रेरणा दिन साजरा केला. ......
📌 विद्यार्थ्यांना अभिवाचन करून दाखवले.
📌 बालवाचनायतील विविध प्रेरणादायी पुस्तकांचे  विद्यार्थ्यांनी वाचन केले.
📌 पुस्तकांवरच्या विविध कविता मुलांना वाचुन दाखवल्या.
📌  आजपासून नियमितपणे अवांतर प्रेरणादायी पुस्तकांचे वाचन करण्याचे मुलांनी ठरवले.
📌 स्वतःच्या वाढदिवसाला प्रत्येक मुलाने एक पुस्तक बालवाचनायला देऊ असा निश्चय केला.
📌 निवडक किशोर खंड चे वाचन मुलांनी केले.
📌 अकारविल्ह्यानुसार शब्दकोश कसा पाहावा हे  मुलांना समजून सांगीतले.
📌 आदरणीय डॉ. कलामांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग मुलांना सांगीतले.
📌 वाचन प्रेरणा दिन कसा वाटला याबद्दल मुले उद्या लिहुन आणणार आहेत.