Monday, 30 November 2015

☆Workshop on "ICT For Schools"☆

☆Workshop on "ICT For Schools"☆
--------------------------------------------------------
                स्थळ- सुलाखे हायस्कुल बार्शी
                दिनांक - 30 नोव्हेंबर 2015

जीडीपी फाऊंडेशनच्या वतीने C-DAC ने Workshop on "ICT For Schools" या विषयावर उस्मानाबाद जिल्ह्यातील भुम,परांडा, वाशी तालूक्यातील जि.प.शाळांच्या शिक्षकांसाठी बार्शी येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

जी.डी.पी फाऊंडेशनचे मा.गोरख कातुरे, मा.सुदर्शन जगदाळे,मा.नितीन मांजरे यांनी कार्यशाळेसाठी C-DAC टीमला आमंत्रीत केले होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण मिळावे म्हणून यांनी सर्व शाळांना फाऊंडेशनच्या माध्यमातून मोफत  संगणक दिलेले आहेत.

C-DAC ही केंद्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाची स्वायत्त संस्था आहे.याचे संस्थापक मा.विजय भटकर हे आहेत.

C-DAC ( centre for Development of Advance Computing ) ने
  📌Online labs for School lab experiments
📌ebasta - School Books to ebooks
📌Open Source Tools
📌AMF - Assessment and Monitoring Framework

या विषयावर प्रात्यक्षिकासह  शिक्षकांना मार्गदर्शन केले व शिक्षकांकडून प्रात्यक्षिक करून घेतली.
C-DAC team Mumbai यांनी मार्गदर्शन केले. ......
▪मा.समाधान मानोरे - सिनिअर टेक्निकल      ऑफिसर
▪मा.मनोजकुमार - टेक्निकल ऑफिसर
▪मा.तुषार शिरगावे- प्रोजेक्ट इंजीनियर

📌 आभासी प्रयोगशाळा (online lab) हा उपक्रम खुप छान आहे. यामध्ये विद्यार्थी प्रयोग करू शकतात. पुन्हा पुन्हा सराव करू शकतात. यामध्ये अॅनिमेशनचा सुंदर उपयोग केला आहे.
याची ऑफलाईन डीव्हीडी पण C-DAC ने तयार केली आहे.ती आम्हाला त्यांच्याकडून मिळाली.
www.olabs.edu.in
📌 ई बस्ता(ebasta)- यामध्ये आपल्या शाळेची नोंदणी करून एका वर्गासाठी सर्व विषयांची ई बुक तसेच इतर उपयोगी ऑडिओ, व्हिडीओ ठेवू शकतो.विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी होण्यास मदत होईल.
ई बस्ता मध्ये बालभारती,NCERT,व इतर राज्यातील बोर्डाची ईबुक उपलब्ध आहेत.
ई बस्ता चे प्ले स्टोअर वरून अॅप घेता येईल.
📌 शाळेतील ई शिक्षण  Interactive व्हावे यासाठी dia(diagram editor),Audacity अशा साॅप्टवेअर्सची माहीती दिली.

या कार्यशाळेसाठी उपक्रमशील शिक्षक राहुल अंधारे, मंगेश मोरे व कातुरे सर व त्यांच्या सहका-यांनी जीडीपी फाऊंडेशनच्या वतीने परिश्रम घेतले.

                                            शब्दांकन 
                                     समाधान शिकेतोड