Sunday 10 December 2017

क्वेस्ट कार्यशाळा


भाषा शिक्षण च्या बाबतीत क्वेस्ट चा ऑनलाईन कोर्स करतोय....स्वतःला समृद्ध करतोय.तिसरे सत्र नुकतेच पुण्यात झाले.याबाबतचा आमच्या क्वेस्ट मधील मित्राने मांडलेला हा अहवाल......

ऑनलाईन भाषा कोर्सचे तिसरे संपर्क सत्र ३ आणि ४ डिसेंबर रोजी पुणे येथे झाले. भाषेतील ध्वनींची जाण वाढवणारे उपक्रम कसे घ्यावेत, मुलांना लिपी परिचय कसा करायचा याचा अभ्यास सहभागींनी केला. नीलेश निमकर सरांनी या क्षेत्रातील आपल्या २० पेक्षा जास्त वर्षांच्या अनुभवाआधारे याविषयाचे खूप चांगले विवेचन केले. ह्या चर्चेमध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात कोणती पद्धत वापरली जाते यावर चर्चा झाली. क्वेस्टने तयार केलेल्या व्हिडिओंच्या माध्यमातून सहभागींना प्रत्यक्ष वर्गात काय करावे याची स्पष्टता मिळाली.
याशिवाय सहभागींनी ‘प्रारंभीचे वाचन शिकवणे- महाराष्ट्रातील अनुभव’ या मॅक्सीन बर्नसन यांनी लिहिलेल्या लेखावर विस्तृत चर्चा केली. बालभारतीची स्थापना झाल्यापासून त्यांनी तयार केलेले पहिलीचे पुस्तक कशा पद्धतीने बदलत गेले याची परखड चिकित्सा मॅक्सिन मावशींनी या लेखात केली आहे.
महाराष्ट्रभर असलेल्या अनेक जाती-जमाती आणि त्यांच्या बोली भाषेतील वैविध्य यांचा वापर करून एकच पाठ्यपुस्तक संपूर्ण महाराष्ट्रासाठी बनवणं अगदी कठिण आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तक बनवण्याची क्रिया जिल्हानिहाय किंवा विभागनिहाय केली तरी ते साध्य होणं अवघड आहे पण इथे उपस्थित असलेल्या आणि हा कोर्स करत असलेल्या विषयतज्ज्ञांनी त्यादृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाच्या मराठी विभाग प्रमुख सुजाता लोहकरे यांनी मांडले. (रिपोर्ट - विनय टांकसाळे)

No comments:

Post a Comment