उस्मानाबाद जिल्ह्यात NAS सराव चाचणी क्र. 2 उत्साहात संपन्न
---------------------------------------------------------------
दिनांक- 24 सप्टेंबर 2019
📚 प्रेरणा 📚
मा.दिपा मुधोळ-मुंडे
जिल्हाधिकारी उस्मानाबाद
मा.डाॅ.संजय कोलते
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद उस्मानाबाद.
⚡मार्गदर्शक⚡
मा.डाॅ.आय.पी.नदाफ
प्राचार्य
DIECPD उस्मानाबाद.
मा.सविता भोसले
शिक्षणाधिकारी (प्रा.)
जि.प.उस्मानाबाद
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत व नीती आयोगांतर्गत NAS चाचणीतील मुलांची संपादणूक पातळी वाढविण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात विविध कार्यक्रमांची,उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.या अनुषंगाने आज दि.24/9/2019 रोजी संपूर्ण जिल्ह्यात एकाच दिवशी NAS सराव चाचणी क्र. 2 संपन्न झाली.
🗓 शुभेच्छा संदेश 🗓
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व शिक्षक व पर्यवेक्षिय अधिकारी यांना NAS सराव चाचणी क्र. 2 साठी शुभेच्छा दिल्या.
📌 इयत्ता 3 री, 5 वी व 8 वी च्या NAS चाचणी सराव प्रश्नसंच PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले. उत्तर लिहिण्यासाठी OMR शीट उपलब्ध करून देण्यात आले.इयत्ता तिसरी,पाचवी व आठवीतील मुलांनी ही चाचणी मुक्त व प्रसन्न वातावरणात दिली.
📌 जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये सदरील चाचणी घेण्यात आली.
📌 जिल्हास्तरावरून चाचणी सुरू असताना सर्व पर्यवेक्षिय अधिकारी यांनी भेटी दिल्या.
📌 मुलांचे प्रश्ननिहाय प्रतिसाद एक्सेल सीट मध्ये नोंदवले जाणार आहेत.त्यामुळे या चाचणीतील मुलांच्या प्रतिसादाचे प्रश्ननिहाय विश्लेषण होईल.त्यामुळे अध्ययन निष्पत्तीची संपादणूक पातळी समजण्यास मदत होईल.त्यामुळे अध्ययन निष्पत्ती आधारित अध्ययन अनुभव देता येतील.
📌 NAS चाचणीतील मुलांच्या संपादणूक पातळी वाढण्यासाठी अध्ययन निष्पत्ती आधारित कृतीकार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
📌 सन 2019-20 मधील NAS चाचणीतील ठेवलेले उद्दिष्ट अशा सराव चाचण्यांमुळे नक्कीच पुर्ण करता येईल.असा विश्वास वाटतो. मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी NAS सराव चाचणी निश्चितच उपयुक्त ठरेल.
समाधान शिकेतोड
DIECPD,उस्मानाबाद.
No comments:
Post a Comment