काल प्रादेशिक विद्याप्राधिकरण यांनी या वर्षी नवोपक्रम स्पर्धेत सहभागी झालेल्या पर्यवेक्षिय अधिकारी व कर्मचारी यांचे सादरीकरण ठेवले होते.मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलेल्या सहभागी स्पर्धकांनी सादरीकरण केले. कोवीडच्या काळात मुलांचे शिक्षण सुरू राहावे यासाठी विविध नवोपक्रम राबविण्यात आलेले होते.
भाषा विषयाच्या पाठावर अध्ययन निष्पत्ती आधारित अध्ययन अनुभव सहविचार अध्ययन अनुभव कशा पद्धतीने देता येतील.याबाबत प्रत्यक्ष मुलांसोबत कृती घेऊन एक मार्गदर्शक व्हिडिओ तयार केला होता.या व्हिडिओमुळे शिक्षकांचा अध्यापनशास्त्रीय दृष्टीकोन विकसित होण्यास सहाय्य नक्कीच होईल.या नवोपक्रमाचे सादरीकरण उत्तम झाले.परिक्षकांनाही हा नवोपक्रम आवडला.
हा व्हिडिओ तयार करण्यासाठी मराठी विभाग प्रमुख आदरणीय श्री.नारायण मुदगलवाड, विषय सहायक श्री.नेताजी चव्हाण,श्री.तानाजी खंडागळे यांची खुप मदत झाली.आम्ही मिळून हे सर्व काम केले.
No comments:
Post a Comment