मीराबाई चानूने ऑलम्पिक वेटलिफ्टिंगमध्ये शनिवारी रौप्य पदक मिळविले. मीराबाईच्या ऐतिहासिक यशामुळे भारताने ऑलम्पिकच्या पहिल्याच दिवशी पदकाची कमाई झाली.मणिपूरच्या या पोलादी महिलेने एकूण दोनशे दोन किलो वजन उचलण्याची ऐतिहासिक कामगिरी केली.वजन उचलताना चेहऱ्यावरील आत्मविश्वास दिसत होता.
मीराबाईची वेटलिफ्टिंग मध्ये कारकीर्द घडावी घडावी म्हणून पाच वर्षांपूर्वी तिच्या आईने आपले दागिने विकले होते.आईच्या त्यागाचे, मेहनतीचे फळ आज मिळाले होते.मुलीच्या पराक्रमाचा आईला अभिमान वाटत होता.
ऑलम्पिकमध्ये आपल्या देशाला खुप कमी पदके मिळतात. त्यासाठी देशात क्रिडासंस्कृती रूजायला हवी.मिराबाई चानू सारख्या मुलींना, कुटुंबाने,समाजाने,शासनाने पाठबळ द्यायला हवे.गावोगाव क्रीडासंकुले तयार व्हायला हवीत.लोकसहभागातूनसुद्धा आपण ही कामे करू शकतो.
No comments:
Post a Comment