Thursday, 12 August 2021

मुलांचे सर्जनशील लेखन

आज जि.प.प्रा.शाळा काटगाव ता.तुळजापूर या शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांशी गुगल मीटद्वारे संवाद साधला.मुलांसोबत मस्त गप्पा मारल्या.मुलांसोबत त्यांच्या सर्जनशील लेखनाबाबत चर्चा केली.या शाळेतील विद्यार्थी दैनंदिनी,कविता, गोष्ट लेखन करत आहेत. काही विद्यार्थ्यांचे लेखन मी वाचलेले आहे.मुले खूप छान व्यक्त होत आहेत.

 काही मुलांची घरची भाषा हिंदी आहे.लिहताना ते घरच्या भाषेचाही वापर करून लिहतात.पण मनातील विचार, भावना छान मांडत आहेत.मुले घरच्या भाषेकडून  माध्यमभाषेकडे हळू हळू येऊ लागतात.त्यासाठी त्यांना व्यक्त होण्याच्या संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात.

 विद्यार्थ्यांना तिन शब्दापासून गोष्ट कशी लिहावी.चित्रावरून गोष्ट कशी लिहावी.गोष्टीची सुरूवात व शेवट कसा करावा.गोष्टीत पात्रे कशी घ्यावीत.त्यांच्या तोंडी संवाद कसे घालावेत. याबद्दल चर्चा केली. मुलांनी स्वतःच्या कविता सादर केल्या. स्वतः काढलेली चित्रे दाखवली. मुलांनी काही प्रश्नही विचारले.

 विद्यार्थ्यांना मी माझी कावळा व कोकोकोला ही कवीता ऐकविली. मुलांना खूप आवडली.मुलांशी छान गप्पा मारल्या.शाळेत कोण होणार करोडपती हा सामान्य ज्ञानावर आधारित उपक्रम राबविला जातोय. मुलांना हा उपक्रम खूप आवडतो.

 उपक्रमशील शिक्षीका श्रीमती रंजना स्वामी व श्री.क्षीरसागर सर यांनी मुलांचे सर्जनशील लेखन या विषयावर चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले होते.दोघांचेही मनापासून अभिनंदन!

 


No comments:

Post a Comment