जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी किशोर मासीकाचे वाचन करावे.वाचन संस्कृती
रूजावी.यासाठी मी उस्मानाबाद जिल्ह्यातील शाळांमध्ये किशोर मासीकासंदर्भात
नवोपक्रम राबवित आहे. शालेय व्यवस्थापन समिती, पालक,शिक्षक, मुख्याध्यापक, यांच्याशी
संपर्क साधून चर्चा करत आहेत.किशोर मासीकाबद्दल माहिती देत आहे.खूप उत्तम प्रतिसाद
मिळत आहे.
काल या नवोपक्रमाच्या संदर्भात माहिती देण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक आदरणीय शिक्षणाधिकारी महोदय यांची भेट घेतली. दहा-पंधरा मिनीटे सविस्तर चर्चा केली.त्यांनी लगेच पर्यवेक्षिय अधिकारी व मुख्याध्यापक यांना प्रेरीत करण्यासाठी पत्र काढण्याचे संबंधितांना सांगीतले.आता नक्कीच या वाचन चळवळीला गती येईल याचा खुप आनंद वाटला.
बालभारतीचे संचालक आदरणीय दिनकर पाटील व किशोरचे कार्यकारी संपादक आदरणीय किरण केंद्रे हे नेहमीच या उपक्रमासाठी पाठबळ व प्रोत्साहन देत आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलांना किशोर हे दर्जेदार व उत्तम वाचनसाहित्य आहे.मुलांपर्यंत पोहचवण्यासाठी मी अविरतपणे प्रयत्न करणार आहे.
आपणही या वाचन चळवळीचा भाग बनाल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
No comments:
Post a Comment