इयत्ता पहिलीचे वर्गशिक्षक श्री.लक्ष्मण घोडके यांनी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न केल्याचे दिसून आले. त्यांनी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी कृतिपुस्तिका तयार केलेल्या होत्या. या कृतिपुस्तिका पाठ्यपुस्तकांवर आधारित होत्या. सुरुवातीची कृतिपुस्तिका शाळापूर्व तयारीवर आधारित होती. त्यानंतर पाठ्यपुस्तकातील दहा-पंधरा पानांवर आधारित कृती पुस्तिका तयार केलेली होती. या कृती पुस्तिकांमधून मुलांना वाचन लेखनाच्या कृती मुलांना स्वयंअध्ययनासाठी दिलेल्या होत्या. सरांनी केलेले प्रयत्न पाहून खूप आनंद वाटला.
इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी वाचन लेखन येणे खूप गरजेचे आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या विद्यार्थ्यांच्या शिकण्यात अडचणी आल्या होत्या. त्यांचा प्रारंभिक भाषा विकास करणे खूप गरजेचे आहे.या पार्श्वभूमीवर सरांचे कार्य कौतुकास्पद आहे.
श्री.लक्ष्मण घोडके यांनी राबवलेल्या उपक्रमाचे सार्वत्रिकीकरण व्हायला हवे. सरांनी तयार केलेल्या कृतीपत्रिका सोबत घेऊन आलो. नक्कीच इतर शाळांनाही याबद्दलची मी माहिती देणार आहे.
No comments:
Post a Comment