सार्थकने माझं स्केच काढून भेट दिलं. मला खूपच आवडलं. सार्थक साडूचा मुलगा आहे. इयत्ता नववीत आहे.सुरूवातीच्या काळात त्याची अभ्यासातील गती कमी होती.आता खूप सुधारणा झालीय.अतिशय अबोल व शांत.तो स्केच खूप सुंदर काढतोय. हा त्याचा छंद मस्तच आहे.
माणसाला काहीतरी चांगला छंद असायला हवा.आयुष्य मजेत जगता येत. जर छंदच करिअर म्हणून निवडलं तर अजून छानच! मळलेल्या, चाकोरीच्या वाटा सोडून मुलांना त्यांच्या आवडीच्या वाटा निवडण्यासाठी प्रोत्साहित व प्रेरीत करणं पालकांची जबाबदारी आहे.
त्याला या क्षेत्रातलं शास्त्रीय शिक्षण देण्याचा मानस आहे.दहावीनंतर काय करता येईल याबाबत माहिती घेणं सुरू आहे.आपल्याला या क्षेत्रातील काही माहीती असल्यास समजून घ्यायला आवडेल.
धन्यवाद सार्थक.
No comments:
Post a Comment