आज पुण्यात शिक्षण अभ्यासक,क्वेस्ट संस्थेचे संचालक आदरणीय नीलेश निमकर यांचे शिकता शिकविता या पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्ध चरित्रलेखिका वीणा गवाणकर, सिनेअभिनेते अतुल कुलकर्णी, शिक्षणशास्त्राचे अभ्यासक किशोर दरक, समकालीन प्रकाशनाचे प्रकाशक आनंद अवधानी या मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
हा सोहळा भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या सभागृहात संपन्न झाला. अतिशय सुंदर, देखण्या व शिक्षणविषयक जाणीवा समृद्ध करणाऱ्या या कार्यक्रमात मान्यवरांनी या पुस्तकावर व शिक्षणातील मूलभूत तत्वज्ञानावर भाष्य केले. गोष्टरंगच्या टिमने ईस्मतची ईद ही गोष्ट सादर केली. आदरणीय निलेश निमकर सरांनी पुस्तकांतील काही भागाचे सुंदर अभिवाचन केले. या कार्यक्रमाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला.क्वेस्ट टिमची भेट झाली.
शिक्षक,पालक,शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकांनी हे पुस्तक वाचायलाच हवं.संग्रही ठेवायला हवं.
या कार्यक्रमचा आस्वाद युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अनेकांनी घेतला. त्याची लिंक कमेन्ट्स बॉक्समध्ये देण्यात येत आहे.कार्यक्रम नक्की पहा.
QUEST Nilesh Nimkar Atul Kulkarni #education
No comments:
Post a Comment