Monday, 12 December 2022

अध्यक्षांचा वाढदिवस

शाळेच्या विकासात शालेय व्यवस्थापन समितीची भूमीका खुपच महत्त्वाची असते.व्यवस्थापन समितीच्या सहकार्यातून खूप सारे बदल घडवून आणणे शक्य होते. महाराष्ट्रातील बदलत गेलेल्या व इतर शाळांसमोर आदर्श ठेवलेल्या शाळांच्या पाठीशी व्यवस्थापन समितीची उभी राहिलेली दिसून येते.आमच्या शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.दर्लींग बेलदार विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापुर्ण शिक्षणासाठी धडपडत असतात. शाळेला व शिक्षकांना मदत,प्रोत्साहन देत असतात. 

अनियमित शाळेत येणाऱ्या पालकांचे प्रबोधन करणे,शिक्षकांसोबत पालकांच्या घरी जाऊन पालकांसोबत चर्चा करणे, शाळेतील अडीअडचणी सोडविणे यात ते नेहमीच अग्रेसर असतात. मी अनेकदा पालकभेटीला त्यांना सोबत घेऊन जातो. मुलांना शाळेत पाठवा असं ते पालकांना तळमळीनं सांगतात.

परवा दहा तारखेला  यांचा वाढदिवस होता.त्यांना आम्ही प्रेमानं दादा म्हणतो. प्रत्येक मुलं शिकावं यासाठी मनात खूपच तळमळ. गावात छोटसं किराणा दुकान व टेलरिंगचा व्यवसाय आहे. अल्प उत्पन्न असूनही नेहमीच शाळेला मदतीची भावना.त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य भेट दिलं. कॅरम, बुद्धीबळ, टेनिस, बुद्धीबळ, खो खो चे खांब इत्यादी साहित्य भेट दिलं. बैठे खेळ व मैदानी खेळासाठी हे साहित्य खुपच उपयुक्त आहे. त्यांचे खूप खूप आभार. इतरही शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य त्यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेला शैक्षणिक साहित्य भेट देतात.विद्यार्थ्यांना वह्या,पेन देतात.कुणी संगणक दुरूस्त करून देते. व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची मदत मोलाची आहे.

धिरे धिरे यहाॅ का मौसम बदलने लगा है।

No comments:

Post a Comment