कृषी,साहित्य, शिक्षण या क्षेत्रातील गुणवंतांना फेलोशिप प्रदान करण्यात आल्या. या गुणवंतांना भविष्यकाळातील नेतृत्वासाठी प्रेरीत केले जाते. सर्जनशील शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे,त्यांच्या उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावं. गुणवत्तेचं सार्वत्रिकीकरण व्हावं. यासाठी अशा राज्यातील ४० प्रयोगशील शिक्षकांना आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते फेलोशिप सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली.
या निमित्ताने राज्यातील प्रयोगशील शिक्षकांशी संवाद साधता आला.त्याचे प्रयोग समजून घेता आले. यशवंतराव चव्हाण सेंटरची भव्य दिव्य वैभव पाहून डोळ्याचं पारणं फिटलं. आदरणीय ताईंनी सर्व शिक्षकांशी अतिशय आपुलकीनं व आत्मियतेनं साधलेला संवाद भावला. प्रत्येक मुलं शिकलं पाहिजे, मुलांच्या अंगभूत कलागुणांचा विकास व्हायला हवा.यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर प्रयोगशील शिक्षकांना नेहमीच मदतीसाठी तयार आहे.असे सांगीतले.
नुकतेच प्रकाशित झालेलं देशोदेशीचे शालेय शिक्षण, आदरणीय डाॅ.वसंत काळपांडे यांचं शालेय प्रशासन व मानवी संबंध,शरद पवार साहेबांचं आत्मकथन लोक माझे सांगाती,यशवंतराव चव्हाण सेंटरने प्रकाशित केलेलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०-प्रश्न मनातले ही पुस्तके भेट मिळाली.
या फेलोशिपच्या माध्यमातून माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीमधील संपादणूक वाढविण्यासाठी प्रकल्प राबविण्यात येणार आहे.या फेलोशिपचा उपयोग नक्कीच शाळेतील मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी होईल असा विश्वास वाटतो.
No comments:
Post a Comment