Wednesday, 27 May 2026

पुस्तक भेट

काल माननीय जिल्हाधिकारी पुजार यांची भेट घेतली. त्यांना माझे मुलांना वाचतं लिहितं करताना हे पुस्तक भेट दिले. त्यांनी पुस्तकावर छान चर्चा केली. पुस्तकाचे कौतुक केले. पुस्तक लिहिण्याच्या प्रक्रियेबद्दल विचारले. पुस्तक नक्की वाचतो. वाचून प्रतिक्रिया ही देतो असे म्हणाले. 

त्याचबरोबर मराठी भाषा समितीच्या पुढील शैक्षणिक वर्षातील कामकाजाबाबत चर्चा झाली. धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण बोलीतील शब्दांचा शब्दकोश तयार करणे, इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांचा मराठी विषयाचा निकाल वाढविणे, प्रशासकीय व्यवहारात मराठी भाषेचा प्रभावीपणे वापर करणे, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम घेणे या विषयावर सविस्तर चर्चा झाली. 
माननीय जिल्हाधिकारी यांना मुलांना वाचतं लिहितं करताना हे पुस्तक भेट दिले.

No comments:

Post a Comment