Monday, 11 May 2015

थोडा पसारा,थोडा कचरा

काही तरी नवीन करून बघायला
काहीच
हरकत नाही
आणि चुका करायला घाबरायचं कारण नाही
चुकांमधून तर खूप शिकत जातो आपण
धोके पत्करायला काहीच हरकत
नाही
आणि घाई करण्याचं काही कारण
नाही
आपली स्वत:ची गती शोधून काढावी..
आणि आपल्याला मनापासून वाटतं
तसंच करावं..
नापास झालं तर काहीसुद्धा
बिघडत नाही..
न घाबरता पुन्हा प्रयत्न करता
येतोच.
कुणाला आपण मूर्ख वाटलो तरी
हरकत नाही
इतरांपेक्षा वेगळे असलो तरी काहीच बिघडत नाही
आपल्या मनाची तयारी होईपर्यंत थांबलं
तरी चालतं
नवे प्रयोग केले तर छानच असतं,
काळजी मात्र घ्यायची  हे असंच
का?
असं विचारायचं..आपण 'आहोत' तसं 'असणं' खासच असतं..
पसारा करणं तर आवश्यक असतं
तो नंतर आवरून टाकला की झालं
नवीन काही निर्माण करायचं तर
थोडा पसारा, थोडा कचरा,
थोडा चिकचिकाट होणारच!

                      —अॅन सायर वाइजमन