Saturday 8 December 2018

समजपूर्वक वाचन प्रकल्पाची तयारी ....

नमस्कार मित्रांनो,
सध्या वाशी तालुक्यात अध्ययन निष्पत्ती आधारित समजपूर्वक वाचन हा प्रकल्प राबविण्यासाठी प्रशिक्षण पुर्व तयारी करतोय. सोमवार पासून पहिला टप्पा सुरू होतोय.त्यासाठी सर्व तयारी..........

आज दुसरा शनिवार पण सकाळी आठ पासून सध्याकाळी सात पर्यंत सर्व तयारीतच गेला.माझे सहकारीही माझ्यासोबत जीव ओतून काम करत आहेत. प्रशिक्षण घटकसंच निर्मिती संदर्भातील कार्यशाळेत अध्ययन निष्पत्ती आधारित काम करण्यासाठी शिक्षक सक्षमीकरणावर अनेक अंगानी चर्चा झाली होती. SCERT पुणे येथे यावर बरेच विचार मंथन  झाले होते.
मुलांसोबत काम करताना वर्गातील आंतरक्रिया कशी घडावी?त्यासाठी काय काय साहित्य हवं.याबद्दल चर्चा झाली होती.प्रशिक्षण घटकसंचही तयार झाला आहे.त्यात आम्ही प्रत्यक्ष वर्गात राबवायचा कृतीकार्यक्रम जोडला आहे.अशा कृतींच्या बकेट तयार केल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांना नेमक्या कोणकोणत्या कृती घ्यायच्या याबद्दल स्पष्टता येईल.

खरं तर गेले दीड वर्ष क्वेस्ट सोबत भाषाशिक्षण समजून घेतले.त्यामुळे खुप शिकता आलं. मुलांसोबत काम करताना खुप समृद्ध अनुभव मिळाले.त्यामुळे पुढे  LBL स्तराधारित अध्ययन कार्यक्रम राबवताना खुप फायदा झाला.हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यामध्ये राबवला जातोय.आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यात  लोहारा तालुक्यात सुरू आहे. या ठिकाणी जे वर्गातील कामाचे 60 दिवसाचे नियोजन केले होते.त्याचा खुप उपयोग झाला.

वाशी तालुक्यातील शिक्षक प्रशिक्षण घेतल्यानंतर वर्गातील कामाला सुरुवात करतील.त्यांन सपोर्ट देण्यासाठी पर्यवेक्षिय यंत्रणेलाही प्रशिक्षण देतोय.
आमचा जिल्हा आकांक्षीत जिल्ह्यापैकी एक आहे.त्यामुळे NAS मधील संपादणूक पातळी वाढण्यासाठी अध्ययन निष्पत्ती आधारित अध्ययन अनुभव देणे आवश्यक आहे. त्यासाठी हा प्रकल्प दिशादर्शक होईल असा विश्वास वाटतो.

No comments:

Post a Comment